भारत आणि फ्रान्स संरक्षण क्षेत्रात भागीदारी आणखी दृढ करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India and France agreed to implement kalpak project narendra modi and Emmanuel Macron
भारत आणि फ्रान्स संरक्षण क्षेत्रात भागीदारी आणखी दृढ करणार

भारत आणि फ्रान्स संरक्षण क्षेत्रात भागीदारी आणखी दृढ करणार

पॅरिस : भारत आणि फ्रान्स यांच्यात संरक्षण क्षेत्रात असलेली सर्व प्रकारची भागीदारी आणखी दृढ करण्यास आणि ‘आत्मनिर्भर भारता’साठीच्या प्रयत्नांना आणखी बळ देणारे कल्पक प्रकल्प राबविण्यास दोन्ही देशांनी मान्यता दिली आहे. कोरोना काळातही राफेल विमानांची निर्मिती करून ती भारतात दाखल झाल्याबद्दल दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले. युरोप दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात फ्रान्सला अल्पकाळासाठी थांबलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची काल (भारतीय वेळेनुसार रात्री उशिरा) भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी संरक्षण क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील सहकार्याबाबत चर्चा केली.

एकमेकांवरील विश्‍वास दृढ असल्याने आत्मनिर्भर भारतासाठीची प्रयत्नांमध्ये फ्रान्सचा सहभाग वाढविण्यासाठी नवीन उपाय शोधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान, उत्पादन आणि निर्यात, दोन देशांमधील उद्योगांमधील भागीदारी असे उपाय यासाठी सुचविण्यात आले आहेत. या शिवाय मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात हरित ऊर्जा आणि सागरी व्यापार सहकार्य या मुद्द्यांवरही चर्चा झाली. फ्रान्स दौऱ्यानंतर मोदी भारतात परतले.

फ्रान्ससमवेतच्या चर्चेतील ठळक मुद्दे

  • राष्ट्रीय संग्रहालय उभारणीत ‘नॉलेज पार्टनर’ म्हणून फ्रान्सचे सहकार्य

  • युक्रेनमधील युद्ध तातडीने थांबविण्याचे दोन्ही देशांचे आवाहन

  • दहशतवादाचा एकत्रितपणे सामना करणार

  • हिंद-प्रशांत क्षेत्रातील मुक्त व सर्वसमावेशक वातावरणासाठी आग्रही

Web Title: India And France Agreed To Implement Kalpak Project Narendra Modi And Emmanuel Macron

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top