India-Canada: आधी आग लावायची अन् पुन्हा विझवायला यायचं; भारत-कॅनडा वादात अमेरिकेची मध्यस्थी?

america india canada
america india canada

नवी दिल्ली- भारत आणि कॅनडामध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. दोन्ही देश आक्रमक पवित्रा घेत आहेत. खलिस्तानवादी हरदिपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याची माहिती अमेरिकेने कॅनडाला दिली होती. त्यानंतर कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावर गंभीर आरोप केले. माहितीनुसार, भारत आणि कॅनडामध्ये निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी आता अमेरिकाच मध्यस्थी करणार आहे.

खलिस्तानवादी हरदिपसिंग निज्जर याची हत्या भारतीय गुप्तचर यंत्रणेने केल्याचा दावा कॅनडाने केलाय. भारताने हा दावा तथ्यहीन असल्याचं म्हणत फेटाळून लावला आहे. असे असले तरी कॅनडा आपल्या आरोपावर ठाम आहे. निज्जर याच्या हत्येमागे भारतच असल्याची गुप्त माहिती अमेरिकेनेच पुरवल्याचं न्यूयॉर्क टाईम्सने म्हटलं आहे. तसेच भारताने याप्रकरणातील तपासात सहकार्य करावे असे आवाहन अमेरिकेकडून करण्यात आले आहे.

america india canada
NIA कडून खलिस्तानी दहशतवाद्याला झटका! भारतीयांना कॅनडा सोडायला लावणाऱ्या पन्नूची संपत्ती जप्त, 'या' ठिकाणी होती मालमत्ता

अमेरिकेचे मध्यस्थी

भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सहकारी देश आहे. भारत आणि अमेरिकेचे संबंध चांगल्या स्थितीत असल्याचं सध्याचं चित्र आहे. पण, कॅनडाला माहिती पुरवून अमेरिका डबल गेम खेलत आहे. अमेरिकेच्या या वर्तनामुळे भारत नाराज असल्याचं बोललं जातंय. त्यातच आता अमेरिका कॅनडा आणि भारतामधील वाद निवळावा यासाठी मागेच्या दरवाज्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

अमेरिकेचा दुटप्पीपणा

अमेरिका दुटप्पीपणा करत असल्याची चर्चा भारतात होऊ लागली आहे. त्यामुळे भारत आणि कॅनडातील वाद मिटावा अशी भूमिका अमेरिका घेणार असल्याचं कळतंय. त्यासाठी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणी सुरु झाल्याची माहिती आहे. भारत हा आशियातील महत्त्वाचा देश आहे. त्यामुळे भारताला दुखावणे आर्थिक आणि सामरिक दृष्ट्या हिताचे नाही याची जाणीव अमेरिकेला आहे.

america india canada
India-Canada: भारत कॅनडा वादामुळे महागाई वाढणार? अशाप्रकारे बिघडू शकते तुमचे आर्थिक गणित

दरम्यान, कॅनडा खलिस्तानवादी चळवळीला पाठिंबा देत असल्याचा आरोप भारताने केला आहे. कॅनडा खलिस्तानी दहशतवाद्यांचे आश्रयस्थान ठरत असल्याची टीका परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंधम बागची यांनी केली होती. केंद्र सरकारने परदेशात राहणाऱ्या खलिस्तान समर्थक लोकांच्या भारतातील संपत्ती जप्त करण्याच्या सूचना एनआयएला दिल्या आहेत. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com