कोविशील्डबाबत डॉ. फाउची म्हणाले, लसींचा पुरेसा साठा नसेल तर...

तीन महिन्यांत ही दुसरी वेळ आहे, जेव्हा कोविशील्ड लसीचा डोस घेण्यातील अंतर वाढविण्यात आलं आहे. सरकारच्या या निर्णयावर सगळीकडून टीका होत आहे.
Dr. Anthony Fauci
Dr. Anthony FauciGoogle File photo
Summary

तीन महिन्यांत ही दुसरी वेळ आहे, जेव्हा कोविशील्ड लसीचा डोस घेण्यातील अंतर वाढविण्यात आलं आहे. सरकारच्या या निर्णयावर सगळीकडून टीका होत आहे.

वॉशिंग्टन : भारतात अजूनही दररोज साडे तीन लाखाच्या आसपास नवे कोरोना रुग्ण (Covid-19 Patient) आढळून येत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सध्या लसीकरण (Vaccination) हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी लसीकरण मोहिमेवर भर दिला. पण देशभरात लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरण मोहिमेला खीळ बसली आहे. या पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि साथीच्या रोगांचे तज्ज्ञ डॉ. अँथनी फाउची (Dr. Anthony Fauci) यांनी महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. (India’s decision to extend gap between Covishield doses is reasonable says Dr Fauci)

Dr. Anthony Fauci
Titanic बुडण्यापूर्वी बाटलीत भरून समुद्रात फेकली होती 'ही' चिठ्ठी?

कोरोना व्हायरसला समूळ नष्ट करण्यासाठी भारताने लसीकरण मोहिमेला गती द्यायला हवी. पण कोविशील्ड (Covishield) लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय भारताने घेतला, हा एक चांगला निर्णय आहे, असे म्हणत डॉ. फाउची यांनी भारताच्या निर्णयाचे कौतुक केले. जेव्हा तुम्ही खूप संकटांचा सामना करत असता, अडचणीच्या काळात असता, आणि तुम्हाला जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करावयाचे असते, अशा वेळी भारताने घेतलेला निर्णय हा योग्य आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Dr. Anthony Fauci
लस घेतलेल्यांना मास्कची गरज नाही; बायडेन यांची मोठी घोषणा

केंद्र सरकारने कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांनी वाढविले आहे. त्यामुळे नागरिकांना कोविशील्डचा दुसरा डोस १२ ते १६ आठवड्यांनी घ्यावा लागणार आहे. तीन महिन्यांत ही दुसरी वेळ आहे, जेव्हा कोविशील्ड लसीचा डोस घेण्यातील अंतर वाढविण्यात आलं आहे. सरकारच्या या निर्णयावर सगळीकडून टीका होत आहे.

डॉ. फाउची म्हणाले की, लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविणे हे कार्यक्षमतेच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरेल. जर तुम्ही दुसरा डोस घेण्यासाठी बराच वेळ घेत असाल, तर लसीचा नकारात्मक परिणाम होण्याची फारच कमी शक्यता आहे. जेव्हा आपल्याकडे पुरेसा लसींचा साठा नसेल, तर अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागतो. मी याचा कव्हर अप म्हणून संदर्भ घेत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com