दहशतवादाचा मुद्दा हाताळण्यात भारत अनुभवी : राजपक्षे

वृत्तसंस्था
रविवार, 9 जून 2019

- श्रीलंकेतील बॉम्बस्फोटानंतर पंतप्रधान मोदींनी दिली पहिल्यांदा भेट.

- दहशतवाद हाताळण्यास भारत अनुभवी, असे म्हणाले राजपक्षे.

कोलंबो : पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका दौऱ्यावर आहेत. मोदी आणि श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्यात भेट झाली. या भेटीदरम्यान राजपक्षे यांनी भारताची स्तुती केली. दहशतवाद हाताळण्यास भारत अनुभवी आहे, असे राजपक्षे यांनी सांगितले.

श्रीलंकेत ईस्टर सणाच्या दिवशी मोठा बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. या स्फोटात 250 हून नागरिकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदा श्रीलंकेला भेट दिली. त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये आज (रविवार) महत्त्वाची बैठक झाली.

या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी राजपक्षे म्हणाले, की दहशतवाद हाताळण्यास भारत अनुभवी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India is an experienced player when it comes to tackling terror says Mahinda Rajapaksa