
ॲक्रा (घाना): भारत आणि घाना या देशांनी आज द्विपक्षीय संबंधांचा दर्जा व्यापक भागीदारी या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. भारत हा घानाचा केवळ भागीदार देश नाही, तर या देशाच्या विकासाच्या प्रवासातील साथीदार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.
पंतप्रधान मोदी हे घाना देशाच्या दौऱ्यावर असून त्यांनी गुरुवारी घानाचे अध्यक्ष जॉन द्रमानी महामा यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यानंतर दोघांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत व्यापक भागीदारीबाबतचा निर्णय जाहीर केला.