

वॉशिंग्टन : ‘‘अमेरिकेतून आयात केलेल्या वस्तूंवर भारत प्रचंड कर वसूल करतो. त्यामुळे तुम्ही त्या देशात काहीही विकू शकत नाही. पण आता ही गोष्ट मान्य करीत भारताने करात मोठी कपात करण्याची तयारी दाखविली आहे,’’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (ता.७) केला.