
India Turkey Trade: भारत आणि तुर्की यांच्यातील व्यापारी संबंध वर्षानुवर्षे दृढ होत गेले आहेत. 2023-24 मध्ये भारताने तुर्कीला 6.65 अब्ज डॉलरचा माल निर्यात केला. यामध्ये बासमती तांदूळ, मसाले, कापड, चहा आणि कॉफी यांचा समावेश आहे. परंतु भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीने पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. याचा परिणाम व्यापार, प्रवास आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीवर होण्याची शक्यता आहे.