esakal | तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा 203 धावांनी विजय 
sakal

बोलून बातमी शोधा

test match

सामन्याच्या चौथ्या दिवशी विजयासाठी फक्त एक बळी हवा असताना पंचानी दिवसाचा खेळ थांबवला. त्यामुळे भारताला विजयासाठी पाचव्या दिवसाची वाट पहावी लागली. मात्र पाचव्या दिवशी खेळ सुरु होताच अॅंडरसन 11 धावांवरक बाद झाला आणि इंग्लंडचा डाव 317 धावांवर संपुष्टात आला. 

तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा 203 धावांनी विजय 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नॉटिंगहम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 203 धावांनी विजय मिळवला. पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरवात होताच भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने जेम्स अॅंडरसनला बाद करुन भारताला विजय मिळवून दिला. 

सामन्याच्या चौथ्या दिवशी विजयासाठी फक्त एक बळी हवा असताना पंचानी दिवसाचा खेळ थांबवला. त्यामुळे भारताला विजयासाठी पाचव्या दिवसाची वाट पहावी लागली. मात्र पाचव्या दिवशी खेळ सुरु होताच अॅंडरसन 11 धावांवरक बाद झाला आणि इंग्लंडचा डाव 317 धावांवर संपुष्टात आला. 

विराट कोहलीचे शतक, चेतेश्वर पुजाराच्या 72 आणि हार्दिक पंड्याच्या 52 धावांच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर 521 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना इशांत शर्माने इंग्लंडच्या सलामी जोडीला फोडले. त्यापाठोपाठ कर्णधार ज्यो रुट आणि ऑली पोप हेदेखील बाद झाले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या जॉस बटलर आणि बेन स्टोक्सने इंग्लंडचा डाव सावरला. सामन्याच्या चौथ्या दिवशी मात्र जसप्रित बुमराने  पाच फलंदाजांना बाद करत भारताचा विजय निश्चित केला. 

नॉटिंगहम सामन्यात भारताने मिळवलेल्या या विजयामुळे पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत नवी चुरस निर्माण झाली आहे.

loading image