जगभरात भारतीयांचा डंका! भारतीय वंशाचे अरुण सुब्रमण्यम दक्षिण आशियाचे पहिले जज: Arun Subramanian | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian American Arun Subramanian to be United States District Judge for the Southern District of New York

Arun Subramanian: जगभरात भारतीयांचा डंका! भारतीय वंशाचे अरुण सुब्रमण्यम दक्षिण आशियाचे पहिले जज

भारतीयांची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे. भारतीय वंशाचे अरुण सुब्रमण्यम यांची दक्षिण आशियाचे पहिले जज म्हणून निवड झाली आहे. याशिवाय ते न्यूयॉर्क जिल्ह्याचे जज म्हणून पदाभार स्वीकारणार आहेत.(Indian American Arun Subramanian to be United States District Judge for the Southern District of New York )

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हा निर्णय जाहीर केला. मंगळवारी भारतीय वंशाचे अरुण अमेरिकन अरुण सुब्रमण्यम यांना न्यूयॉर्कच्या दक्षिणी जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश म्हणून घोषित केले आहे.

Physical Relation : इथे लैंगिक संबंधांना समजले जाते पाप; एकाच कारणासाठी लोक ठेवतात संबंध

त्यांच्या नियुक्तीमुळे या खंडपीठावर काम करणारे ते पहिले दक्षिण आशियाई न्यायाधीश बनले आहेत. युनायटेड स्टेट्सने मंगळवारी संध्याकाळी 58-37 मतांनी अ‍ॅटर्नीकडून सुब्रमण्यन यांच्या नामांकनावर मोहर उमटवण्यात आली आहे.

न्यूयॉर्क जिल्हा कोर्टामध्ये अरुण सुब्रमण्यम यांच्या व्यतिरिक्त इतर नावांची देखील शिफारस करण्यात आली होती. मंगळवारी हा प्रस्ताव सिनेटमध्ये पाठवण्यात आला. जो बायडन यांनी अरुण सुब्रमण्यम यांच्या नावावर शिक्कमोर्तब केला आहे.

China CCTV : भारतातल्या प्रत्येक हालचालींवर चीनची नजर; देशातले 10 लाख सीसीटीव्ही कॅमेरे...

सुब्रमण्यम यांचा प्रवास

सुब्रमण्यम सध्या न्यूयॉर्कमधील लॉ फर्म सुसमन गॉडफ्रे एलएलपीमध्ये भागीदार आहेत. 2007 पासून ते येथे काम करत आहेत. त्यांनी 2006 ते 2007 या कालावधीत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती रूथ बेड जिन्सबर्गसाठी लिपिक म्हणून काम केले.

यापूर्वी त्यांनी 2005 ते 2006 या काळात न्यूयॉर्कच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात न्यायमूर्ती जेरार्ड ई लिंचसाठी काम केले. 2004 ते 2005 पर्यंत ते अपील कोर्टाचे न्यायाधीश डेनिस जेकब्स यांचे लॉ लिपिक होते.

टॅग्स :United States Of America