भारतीय चलन व्यवहार अमेरिकेच्या रडारवर

वृत्तसंस्था
Sunday, 15 April 2018

संशयास्पद धोरण असलेल्या देशांमध्ये समावेश

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने संशयास्पद परकी चलन धोरण असलेल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश केला आहे. या यादीत चीन, जर्मनी, जपान, कोरिया आणि स्वित्झर्लंड यांचाही समावेश आहे.

संशयास्पद धोरण असलेल्या देशांमध्ये समावेश

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने संशयास्पद परकी चलन धोरण असलेल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश केला आहे. या यादीत चीन, जर्मनी, जपान, कोरिया आणि स्वित्झर्लंड यांचाही समावेश आहे.

अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, संशयास्पद परकी चलन धोरण असलेल्या देशांचे चलन व्यवहार काळजीपूर्वक तपासले जाणार आहेत. संसदेसमोर याबाबत सहामाही अहवाल सादर करण्यात आला असून, पुढील आणखी दोन अहवाल संसदेसमोर सादर होईपर्यंतच्या काळात हे देश यादीत कायम राहणार आहेत. या देशांच्या परकी चलन धोरणात सुधारणा झाल्यास त्यांना यादीतून काढण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

या यादीतील देशांकडून चलनामध्ये फेरफार केले जात असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, यासाठी दोन ते तीन निकष आहेत. अमेरिकेची चीनशी व्यापारी तूट 337 अब्ज डॉलर असल्याने चीनचा या यादीत समावेश आहे. या देशांच्या चलन व्यवहारांवर बारकाईने नजर ठेवण्यात येणार असून, व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी नवे धोरण आणण्यास आणि सुधारणा करण्यास त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल, असे अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने नमूद केले.

यादीतील देश
- भारत, चीन, जपान, कोरिया, जर्मनी, स्वित्झर्लंड

प्रमुख कारणे
- व्यापारातील फायद्यासाठी स्थानिक चलनाच्या मूल्यात बदल
- स्वस्त निर्यातीसाठी स्थानिक चलनाचे मूल्य कमी ठेवणे
- परकी चलनाची खरेदी वाढूनही स्थानिक चलन वधारणे
- व्यापारातील तफावत दूर करण्यासाठी प्रयत्न नाहीत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian currency transactions on the US radar