Anti Terror Mission : दहशतवादाविरोधात लढ्याचा निर्धार; सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या ‘यूएई’, जपानमध्ये गाठीभेटी
Operation Sindoor : दहशतवादाविरोधातील कारवाईबाबत भारताने जागतिक स्तरावर स्पष्ट संदेश देण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ यूएई आणि जपानमध्ये पाठवले. शिष्टमंडळाने स्थानिक नेते, थिंक टँक व अधिकारी यांच्याशी भेटी घेत ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत माहिती दिली.
अबू धाबी/टोकियो : दहशतवादावर कठोर प्रहार करण्याच्या हेतूने ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात जागतिक स्तरावर संदेश देण्यासाठी पाठविण्यात आलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांनी आज संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि जपान येथे गाठीभेटी घेतल्या.