
Indian diaspora in the US sing Ram Bhajan : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अवघ्या काही तासांमध्ये सुरू होणार आहे. यामुळे संपूर्ण जगभर राममय वातावरण झालं आहे. अमेरिकेत देखील ठिकठिकाणी रामनामाचा गजर सुरू आहे. मॅसाचुसेट राज्यातील नॉर्थबोरो येथे असणाऱ्या श्रीकृष्ण मंदिरातील राम भजनाचा व्हिडिओ समोर आला आहे.
नॉर्थबोरो येथील श्री राधाकृष्ण मंदिरात तेथील भारतीय कम्युनिटीचे रामभक्त एकत्र जमले होते. यावेळी त्यांनी एकत्रितपणे राम भजन गायले. अयोध्येतील मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जगभरातील तमाम श्रीरामभक्तांना ज्या दिवसाची प्रतिक्षा होती, तो दिवस आज आला आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. यासाठी देश-विदेशातील कित्येक मान्यवरांना आमंत्रण देण्यात आलं आहे.
प्राण प्रतिष्ठेसाठी आज दुपारी 12 वाजून 29 मिनिट आणि 08 सेकंद ते 12 वाजून 30 मिनिट आणि 32 सेकंद असा ८४ सेकंदांचा शुभ मुहूर्त असणार आहे. यानंतर एक वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आपले विचार व्यक्त करतील. दोन वाजेनंतर सर्व मान्यवरांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता येईल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.