Suhas Subramanyam: कोण आहेत भारतीय वंशाचे सुहास सुब्रमण्यम? अमेरिकेत डंका! ट्रम्प यांच्या पक्षाच्या उमेदवाराला चारली धूळ!

Who Is Suhas Subramanyam? Indian-Origin US Politician : भारतीय वंशाचे सुहास सुब्रमण्यम यांनी ६१.५ टक्क्यांहून अधिक मते मिळवत अमेरिकेत विजयाचा झेंडा फडकवला.
Suhas Subramanyam

Indian-origin politician Suhas Subramanyam wins the US House of Representatives election

esakal

Updated on: 

Who is Suhas Subramanyam? अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांच्या निकालांमध्ये भारतीय वंशाच्या सुहास सुब्रमण्यम यांनी मोठे यश मिळवले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करत त्यांनी प्रतिनिधीगृहाच्या निवडणुकीत विजय मिळवला. सुहास यांनी ६१.५ टक्क्यांहून अधिक मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेतली. तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डेव्ह बेकविथ यांना केवळ ३६.४ टक्के मतांवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे ट्रम्प यांना राजकीय धक्का बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...