Plane Crash in USA: अमेरिकेत पर्यटक विमान कोसळलं! भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू, मुलगी अन् पायलट जखमी

अमेरिकेतील न्यूयॉर्क इथं दुपारच्या वेळेत ही दुर्घटना घडली.
Plane crash in USA
Plane crash in USA

न्यूयॉर्क : अमेरिकेत एक खासगी छोट विमान कोसळल्याचं वृत्त आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या एका भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तिची मुलगी आणि पायलट हे दोघं या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. रविवारी न्यूयॉर्कमधील नॉर्थ लिंडेनहर्स्ट इथं ही घटना घडली. स्थानिक माध्यमांनी याबाबत वृत्त दिलं आहे. (Indian origin woman killed daughter and pilot injured in plane crash in US)

या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या महिलेचं नाव रोमा गुप्ता (वय ६३) तर तिच्या मुलीचं नाव रीवा गुप्ता (वय ३३) आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, सफोल्क काऊंटी पोलिसांना पायलटची देखील ओळख पटली आहे. त्याचं नाव फैझुल चौधरी (वय २३) असून त्याला स्टोनी ब्रूक युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

दुर्घटना कशी घडली?

पोलिसांच्या माहितीनुसार, ईस्ट फर्मिंगडेलच्या रिपब्लिक एअरपोर्टवरुन दुपारी २.१८ वाजता छोट्या विमानानं उड्डाण केलं. यामध्ये तीन व्यक्ती होत्या, यामध्ये दोन महिलांचा समावेश होता. हे पर्यटक विमान होतं. विमानातून धूर येत असल्याचं पायलटला दिसून आलं, त्यानंतर त्यानं याची माहिती तातडीनं रिपब्लिक एअरपोर्टच्या एअर ट्राफिक कन्ट्रोलला दिली. यानंतर या विमानाला इमर्जन्सी लँडिंगसाठी परवानगी देण्यात आली. पण विमानतळावर उतरण्यापूर्वीच हे कोसळलं.

Plane crash in USA
Ravindra Dhangekar: आमदार धंगेकर अन् जगताप अधिवेशनात लावणार हजेरी! 'या' दिवशी होणार शपथविधी

हे विमान मोकळ्या जागेत कोसळल्यानं इतर कोणीही या दुर्घटनेत जखमी झालेलं नाही किंवा कुठल्याही मालमत्तेच नुकसान झालेलं नाही. खरंतर या विमानातील पायलट हा अशा परिस्थितीत विमानावर नियंत्रण मिळवण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. पण लँडिंगवेळी विमानाचा स्पीड अपेक्षित स्पीडपेक्षा खूपच कमी झाल्यानं विमान क्रॅश झालं, अशी माहिती विमान कंपनी फरमिंगडल स्टेट कॉलेज ऑफ एव्हिएशनचे संचालक मायकल कँडर्स यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com