प्रत्यक्षदर्शी सांगतोय, भारतीय वैमानिक असा कोसळला...

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019

मुजफ्फराबाद (पाकिस्तान): गावः होर्रा, वारः बुधवार, वेळः सकाळी 8.45. मोठा आवाज झाला अन् धुराचा वास येऊ लागला. आवाजाने घराबाहेर पडलो तर जवळच एक विमान पडले होते अन् वैमानिक पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरत होता, हे सांगत आहे प्रत्यक्षदर्शी 58 वर्षीय मोहम्मद रझाक चौधरी. पाकिस्तानमधील 'डॉन' या वृत्तपत्राने त्यांनी दिलेली माहिती प्रसिद्ध केली आहे.

एलओसीपासून सात किलोमीटर अंतरावर होर्रा हे गाव. चौधरी सांगतात, 'घरापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर विमान कोसळले. मोठा आवाज व धुराच्या वासामुळे घराबाहेर आलो तर तीन वैमानिक पॅराशूटच्या सहाय्याने खाली येत होता. एक वैमानिक माझ्या घरापासून जवळ असलेल्या अंतरावर कोसळला. काही वेळातच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व युवक धावले. दरम्यानच्या काळात वैमानिक सावध झाला होता. अपघातग्रस्त विमानाचा वैमानिक हा भारतीय असल्याचे सिद्ध झाले होते. युवक व ग्रामस्थ घोषणाबाजी करू लागले. वैमानिकाने बचावासाठी साधारणता अर्धा किलोमीटर पळत राहिला. एका ठिकाणी तो पडला... तो तहाणलेला होता. त्याने पाण्याची मागणी केली.'

'पण, पाकिस्तानी युवक पाकिस्तान आर्मी जिंदाबाद... म्हणून वैमानिकाला मारहाण करत होते. काहीजणांनी दगड फेकून मारत होते. बचावासाठी त्याने हवेत गोळीबार केला. तो पाण्यात पडल्यानंतर त्याने खिशातील काही कागदपत्रे काढून बाहेर फेकली. त्याचा पिस्तूल बाजूला पडल्यानंतर युवकांनी त्याला मारहाण करण्यास सुरवात केली. दरम्यान, भारतीय वैमानिकाला पकडल्याची माहिती सैनिकांना मिळाली. पाकिस्तानी सैनिक घटनास्थळी दाखल झाले. नागिरकांच्या तावडीतून वैमानिकाची सुटका केली व लष्करी वाहनातून सुरक्षितस्थळी हलवले.'

धन्यवाद देवा.... युवकाच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला नाही, असे चौधरी यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian pilot fired into air before being captured, says Horra village people