
सिडनी : आॅस्ट्रेलियातील अॅडलेड येथे चरणप्रीत सिंग या भारतीय विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. मोटार उभी करण्यावरून एका टोळक्याशी चरणप्रीत सिंग याचा वाद झाला, यावेळी चरणप्रीत सिंग याला उद्देशून या टोळक्याने वंशद्वेषी टिपणी केली आणि त्याला जबर मारहाण केली. या मारहाणीत चरणप्रीत याच्या मेंदूला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे.