narendra modi joe biden
narendra modi joe bidensakal

India - Usa Relationship: शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ; या देशाचे विद्यार्थी सर्वाधिक!

Published on

India - Usa Relationship: कोरोना संसर्गस्थितीमुळे अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये घटलेली परदेशी विद्यार्थ्यांची संख्या आता पुन्हा वेगाने वाढण्यास सुरुवात झाली असून त्यामध्ये मोठा वाटा भारतीय विद्यार्थ्यांचा आहे. वाढलेल्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण ३५ टक्के आहे.

अमेरिकेत २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येत १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकाच वर्षात एवढी वाढ होण्याची मागील ४० वर्षांतील ही पहिलीच घटना आहे. या वर्षी सुमारे दहा लाख विद्यार्थी अमेरिकेत शिकण्यासाठी आले.

narendra modi joe biden
USA President: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा होणार अमेरिकेचे अध्यक्ष? बायडेन यांच्याबाबत वाढती नाराजी

उच्चशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची अमेरिकेलाच सर्वाधिक पसंती असल्याचेही यामुळे दिसून आले आहे. शिक्षण क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांचे अत्यंत दृढ संबंध आहेत. मागील शैक्षणिक वर्षात भारतातून दोन लाख ६९ हजार विद्यार्थी अमेरिकेत गेले.

भारतामधून अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. अद्यापही अमेरिकेतील परदेशी विद्यार्थ्यांमध्ये चीनचे विद्यार्थी (दोन लाख ९० हजार) सर्वाधिक असले तरी सलग तीन वर्षांपासून ही संख्या घटते आहे.

narendra modi joe biden
USA Vs China : चीन अमेरिकेविरुद्ध युद्धाच्या तयारीत आहे ; निक्की हेलींचा मोठा दावा

चीनपेक्षा भारताला प्राधान्य

- चीन-अमेरिकेतील तणावाचा परिणाम

- चीनमधील विद्यार्थ्यांचा ब्रिटन, कॅनडाकडे वाढता ओढा

- अमेरिकी विद्यापीठांचाही भारतीय विद्यार्थ्यांकडेच कल

- अमेरिकेतील २४ राज्यांमध्ये चीनपेक्षा भारतीय विद्यार्थ्यांची संख्या अधिक

येथील विद्यार्थ्यांचा अमेरिकेकडे ओढा (प्रमाणानुसार)

१. चीन

२. भारत

३. दक्षिण कोरिया

४. कॅनडा

५. व्हिएतनाम

६. तैवान

narendra modi joe biden
USA News : 9/11 दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांची फाशीची शिक्षा होणार माफ? अमेरिकेत संतापाची लाट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com