इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षात भारतीय महिलेचा मृत्यू

इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षात भारतीय महिलेचा मृत्यू

जेरुसलेम - इथल्या अल अक्सा मशिदीत पॅलेस्टाइन (Palestine) आणि इस्रायलच्या (Israel) सुरक्षा दलामधील चकमकीने आता रौद्र रुप धारण केलं आहे. आता या दोन्हींमधील संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्हीकडून रॉकेट हल्ला (Rocket Attack) केला जात आहे. यामध्ये आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका भारतीय महिलेचाही (Indian Women) समावेश आहे. सौम्या संतोष असं महिलेचं नाव असून ती गेल्या सहा वर्षापासून महिला इस्रायलमध्ये राहत होती.

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, हमासनं रहिवाशी भागात जवळपास 130 रॉकेटचा हल्ला केला. तर जेरुसलेममध्येही मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. यात भारतीय महिलेचा मृत्यू झाला. भारतात इस्रायलचे राजदूत डॉक्टर रॉन मलका यांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी सौम्या संतोष यांच्या कुटुंबियाच्या दु:खात आपण सहभागी असल्याचं म्हणत शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. ट्विटरवर त्यांनी म्हटलं की, इस्रायलकडून सौम्या संतोष यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. त्यांचा हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. एका 9 वर्षाच्या मुलाने या क्रूर दहशतवादी हल्ल्यात त्याच्या आईला गमावलं आहे. या घटनेनं आम्हाला खूप दु:ख झालं आहे.

इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षात भारतीय महिलेचा मृत्यू
बारा वर्षांपुढील सर्वांचे अमेरिकेत आता लसीकरण

हल्ला झाला त्यावेळी सौम्या एका 80 वर्षीय महिलेसह घरात होत्या. सौम्या या वृद्ध महिलेच्या केअरटेकर होत्या आणि बऱ्याच काळापासून त्यांची काळजी घेत होत्या. हमासच्या रॉकेट हल्ल्यात त्यांचे घरही वाचू शकले नाही. 80 वर्षीय महिला या हल्ल्यातून बचावली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुासार, ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी सौम्या व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पतीसोबत बोलत होत्या. मात्र अचानक हल्ला झाला आणि व्हिडिओ कॉल बंद झाला.

इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षात भारतीय महिलेचा मृत्यू
रशियातील शाळेत गोळीबार; विद्यार्थ्यांसह 11 जणांनी गमावला जीव

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनीही रॉकेट हल्ल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. नेतन्याहू यांनी म्हटलं की,''हमासने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आता त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल.'' जेरुसलेम शहरावर पॅलेस्टाइन आणि इस्राईल या दोघांचा दावा आहे. यावरून अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. या संघर्षाला काही आठवड्यांपुर्वी पुन्हा तोंड फुटले असून वेस्ट बँक, गाझा पट्टी येथेही शेकड्यांच्या संख्येने अरब समुदायातील लोक एकत्र येत इस्राईलचा निषेध करत आहेत. गेल्या चार दिवसांपासून इस्राईलचे सैनिक या जमावावर अश्रुधुराचा मारा केला आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com