चर्चा रद्द करण्याचा भारताचा निर्णय "उर्मटपणा'चा- इम्रान खान

वृत्तसंस्था
रविवार, 23 सप्टेंबर 2018

भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची न्यूयॉर्कमधील चर्चा रद्द करण्याचा भारताचा निर्णय उर्मटपणाचा असल्याची टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज केली आहे. भारताकडून मिळालेल्या नकारात्मक प्रतिसादामुळे आपण निराश झालो असल्याचेही खान यांनी म्हटले आहे.ोव

इस्लामाबाद- भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची न्यूयॉर्कमधील चर्चा रद्द करण्याचा भारताचा निर्णय उर्मटपणाचा असल्याची टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज केली आहे. भारताकडून मिळालेल्या नकारात्मक प्रतिसादामुळे आपण निराश झालो असल्याचेही खान यांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) आमसभेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये होणार असलेली चर्चा रद्द करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. जम्मू आणि काश्‍मीरमध्ये तीन पोलिसांची झालेली हत्या आणि ठार करण्यात आलेला काश्‍मिरी दहशतवादी बुऱ्हाण वणीच्या नावाने पाकिस्तानने काढलेल्या टपाल तिकिटाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील परराष्ट्रमंत्र्यांच्या पातळीवरील चर्चा भारताकडून रद्द करण्यात आली आहे. या निर्णयावर खान यांनी आज टीका केली.

भारताचा प्रतिसाद उर्मटपणाचा आणि नकारात्मक आहे. मोठी दृष्टी नसलेल्या व्यक्ती मोठ्या पदांवर असल्याचे मी आयुष्यभर पाहात आलो आहे, असे खान यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indias decision to discontinue the discussion is Furoriness Says Imran Khan