esakal | आव्हानांचा सामना करताना भारताची भूमिका महत्त्वाचीच असेल
sakal

बोलून बातमी शोधा

S Jaishankar

आव्हानांचा सामना करताना भारताची भूमिका महत्त्वाचीच असेल

sakal_logo
By
पीटीआय

न्यूयॉर्क - जगासमोरील आव्हानांचा (Challenges) सामना करताना आंतरराष्ट्रीय पातळीवर यापुढेही भारताची (India) भूमिका (Role) महत्त्वाची (Important) राहिल, असा विश्‍वास परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) यांनी आज व्यक्त केली. जयशंकर हे पाच दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती आणि इतर अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. (Indias Role will be Crucial in Meeting the Challenges S Jaishankar)

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये अस्थायी सदस्य म्हणून जानेवारीमध्ये भारताचा समावेश झाल्यानंतर जयशंकर यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. आजच्या बैठकीत जागतिक घडामोडींमधील भारताच्या भूमिकेबाबत चर्चा झाल्याचे समजते. सुरक्षा समितीमध्ये भूमिका मांडण्याबाबत मार्गदर्शन केल्याबद्दल जयशंकर यांचे आभार व्यक्त करणारे ट्वीट तिरुमूर्ती यांनी केले आहे. या दौऱ्यादरम्यान ते संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांची भेट घेणार आहेत. तसेच, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांचीही ते भेट घेणार आहेत. यावेळी कोरोनाविरोधातील लढाई, क्वाड गटाचे सहकार्य, संयुक्त राष्ट्रांमधील आणि इतर विविध पातळ्यांवरील सहकार्य याबाबत चर्चा अपेक्षित आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांचीही ते भेट घेणार आहेत.