'या' नव्या तंत्रज्ञानाने भारतात विमान लँड; आशिया-पॅसिफिक भागातील पहिला देश | Indigo Flight Land with GAGAN System | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

indigo
'या' नव्या तंत्रज्ञानाने भारतात विमान लँड; आशिया-पॅसिफिक भागातील पहिला देश | Indigo Flight Land with GAGAN System

'या' नव्या तंत्रज्ञानाने भारतात विमान लँड; आशिया-पॅसिफिक भागातील पहिला देश

इंडिगोने (Indigo) गुरुवारी राजस्थानमधील किशनगड विमानतळावर (Kishangarh Airport) भारतनिर्मित सॅटेलाईट आधारित ऑग्युमेंटेड सिस्टम ‘गगन'च्या (GAGAN-जीपीएस एडेड जीईओ ऑग्युमेंटेड नेविगेशन ) मदतीने चाचणी विमान यशस्वीरित्या लँड केलं. एअर नेव्हिगेशन सिस्टिमच्या क्षेत्रातील एक मोठी झेप म्हणून याकडे पाहिले जात आहे.

भारताशिवाय हे तंत्रज्ञान फक्त अमेरिका, युरोप आणि जपानमध्ये वापरले गेले आहे. ही प्रणाली भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. इंडिगोच्या ATR-72 विमानावर त्याची चाचणी घेण्यात आली आहे. इंडिगोचे संचालक आणि सीईओ रॉनजॉय दत्ता म्हणाले की, 'गगन' नागरी विमान वाहतूकसाठी गेम चेंजर ठरेल. यामुळे हवाई प्रवासाचे आधुनिकीकरण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: विमानसेवा पुरवणाऱ्या 'इंडिगो' कंपनीची बंपर कमाई; पाहा किती आहे उत्पन्न

गगनमुळे काय होणार?

DGCA ने 2015 मध्ये अप्रोच विथ व्हर्टिकल गाईडन्स (APV-1) आणि एन-रूट (RNP 0.1) ऑपरेशन्स प्रणालीला मान्यता दिली होती. लोकलायझर परफॉर्मन्स विथ व्हर्टिकल गाईडन्स (LPV) विमानाला जमिनीवरील कोणत्याही नेव्हिगेशन इन्फ्रास्ट्रक्चरशिवाय लँड करण्यास मदत करते. ही सेवा जीपीएस आणि 'गगन' जिओ स्टेशनरी सॅटेलाइटवर अवलंबून आहे. 'गगन' नेव्हिगेशनच्या मदतीने विमानाला लँडिंग करण्यासाठी लेटरल आणि व्हर्टिकल निर्दश देईल. या तंत्रज्ञानाला अंतिम परवानगी मिळताच ते देशातील सर्व व्यावसायिक विमान कंपन्यांमध्ये वापरासाठी उपलब्ध करून दिले जाईल. यामुळे महागड्या लँडिंग सिस्टिम नसलेल्या विमानतळांवर विमानांना उतरणे सोपे होईल. तसेच, यामुळे उड्डाणांना होणारा विलंबाचा त्रास कमी होईल आणि इंधनाचीही बचत होईल.

DGCA आदेश-

गेल्या वर्षी जुलैमध्ये नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) देशातील सर्व नोंदणीकृत विमानांना 'गगन' प्रणालीने सुसज्ज करण्याचे आदेश दिले होते. छोट्या विमानतळांवर हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल, असे निवेदनात म्हटले आहे. इंडिगोच्या ट्रायल फ्लाइटमध्ये डीजीसीएचे अधिकारीही बसले होते, हे लक्षात घेण्यासारखे आहे.

एएआयने मच्छिमारांसाठीही विकसित केले आहे तंत्रज्ञान-

AAI ने इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशनिक इन्फॉर्मेशन सर्व्हिसच्या सहकार्याने 'गगन' संदेश सेवा देखील सुरू केली आहे. याद्वारे पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी मच्छिमार आणि आपत्तीग्रस्त लोकांना सतर्कतेचे संदेश पाठवले जातील.

Web Title: Indigo Successfully Landed A Trial Flight At Kishangarh Airport With The Help Of India Made Satellite Based Augmented System Gagan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top