जगातील आठ अब्जाधीशांना ४१ अब्ज डॉलरचा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Eight billionaires 41 billion dollars loss

जगातील आठ अब्जाधीशांना ४१ अब्ज डॉलरचा फटका

नवी दिल्ली : महागाई आणि अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे व्याजदरवाढीचे धोरण यामुळे आज अमेरिकी शेअर बाजार कोसळले. शेअर बाजारातील या सुनामीमुळे जगातील पहिल्या दहा अब्जाधीशांपैकी आठ अब्जाधीशांना तब्बल ४१ अब्ज डॉलरचा फटका बसला. यामध्ये अॅमेझॉनचे माजी सीईओ जेफ बेझोस यांचे ९.८४ अब्ज डॉलरचे, टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांचे ८.३५ अब्ज डॉलरचे तर बिल गेट्स यांचे २.८४ अब्जचे नुकसान झाले आहे.

अमेरिकी शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक डाऊ जोन्स आज १२७६अंशांपेक्षा जास्त घसरणीसह ३१,१०४च्या पातळीवर बंद झाला. या भीतीमुळे टेस्ला, मायक्रोसॉफ्ट, अॅपल, गुगल, अॅमेझॉनसारखे दिग्गज शेअर कोसळले. या बड्या कंपन्यांशी संबंधित अब्जाधीशांच्या संपत्तीवरही त्याचा परिणाम झाला. ब्लूमबर्ग बिलियनेअर यादीतील पहिल्या दहा अब्जाधीशांपैकी अनुक्रमे तिसऱ्या आणि नवव्या क्रमांकावर असलेल्या गौतम अदानी आणि मुकेश अंबानी या भारतीय उद्योगपतींच्या संपत्तीत मात्र वाढ झाली आहे. गौतम अदानी यांच्या संपत्तीत १.५८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे, तर अंबानींच्या संपत्तीत १.२३ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

Web Title: Inflation World Eight Billionaires 41 Billion Dollars Loss Us Stock Market Crashed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..