मोठी बातमी! Elon Musk यांचा ट्विटर खरेदीचा करार रद्द

मस्क यांनी ट्विटरसोबतचा करार संपल्याची घोषणा करत कंपनीवर आरोप केलेत.
Elon Musk Terminate Twitter Deal
Elon Musk Terminate Twitter Dealesakal
Summary

मस्क यांनी ट्विटरसोबतचा करार संपल्याची घोषणा करत कंपनीवर आरोप केलेत.

Elon Musk : टेस्लाचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर (Twitter) विकत घेणार नसल्याचं जाहीर केलंय. कंपनीनं अटी मोडल्या असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळं आता ट्विटरची 44 अब्ज डॉलरचा करार संपुष्टात आलाय.

एलॉन मस्क यांनी शुक्रवारी यासंदर्भात घोषणा करत, आपण ट्विटर विकत घेणार नसल्याचं सांगितलं. मस्क यांनी ट्विटरसोबतचा करार संपल्याची घोषणा करत कंपनीवर आरोप केलेत. मस्क यांनी म्हटलंय की, 'ट्विटर कंपनी बनावट खात्यांचा (Fake Accounts) तपशील देण्यात अयशस्वी ठरलीय.' दरम्यान, एलॉन मस्कच्या या निर्णयाविरोधात ट्विटर कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत आहे.

ट्विटर हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ४४ अब्ज डॉलरला (44 Billio USD) खरेदी करण्याचा निर्णय एलॉन मस्कनं घेतला होता. एक ट्वीट करून एलॉन मस्कनं ट्विटर किती किमतीत खरेदी करणार हे जाहीर केलं होतं. यानंतर व्यवहाराची पुढील प्रक्रिया सुरू झाली होती. यामुळं ट्विटरची मालकी मस्कच्या हाती जात असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. पण, आता मस्कनं ट्विटर खरेदीची योजना रद्द केलीय.

Elon Musk Terminate Twitter Deal
शिंजो आबे, लिंकन, केनेडी, महात्मा गांधी, इंदिरा-राजीव.. जगाला हादरवून सोडणाऱ्या हत्या

ट्विटरवर किती बनावट हँडल (Fake Twitter Handle) आणि किती स्पॅम करणारी हँडल (Spam Twitter Handle) आहेत याची ठोस माहिती मागितली होती. ही माहिती मिळत नसल्यामुळं ट्विटर खरेदी करण्याची योजना रद्द करत असल्याचं एलॉन मस्कनं जाहीर केलं. पण, मस्कच्या या घोषणेमुळं बाजारातील ट्विटरच्या विश्वासार्हतेवर परिणाम झालाय. शेअर बाजारातील ट्विटरची पत घसरलीय. मस्कच्या कृतीमुळं झालेलं नुकसान त्यानं भरून द्यावं, असं ट्विटरच्या व्यवस्थापनाचं म्हणणं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com