
वॉशिंग्टन - मुलांच्या वाढीच्या वयातील विशिष्ट टप्प्यात त्यांचे मन संगीत शिकण्यासाठी सर्वांधिक ग्रहणक्षम असते, असा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय संशोधकांनी काढला आहे. स्वीडनमधील कारोलिंस्का इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. त्याचे निष्कर्ष ‘सायकॉलॉजिकल सायन्स’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.
प्रमुख संशोधक लॉरा वेसलडीज यांच्या मते अनेक यशस्वी संगीतकारांनी त्यांचे संगीताचे प्रशिक्षण आयुष्यात खूप लवकर सुरू केले असल्याचे दिसते. यासंदर्भातील बहुचर्चित निष्कर्ष म्हणजे त्यांनी अगदी बालपणात संगीताचे पहिले धडे गिरविले. या वयात मेंदू संगीतामुळे अधिक उत्तेजित होतो. मात्र, आम्हाला इतक्या लहान वयात संगीत शिकण्यामागचे कारण पूर्वी वर्तविलेल्या अंदाजापेक्षा अधिक गुंतागुंतीचे असू शकते, असे आढळले. त्याचप्रमाणे, अगदी बालपणात सुरवात केल्यामुळे प्रौढ वयात संगीतातील उच्च प्रकारची कौशल्ये प्राप्त करता येऊ शकतात. या गोष्टीचा संबंध कौटुंबिक प्रभावाशीही येतो. यात अनुवंशिक घटक व कुटुंबातील सांगीतिक वातावरणाचा समावेश होतो.
वेसलडीज व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वीडनमधील विविध संगीत संस्थांतील ३१० संगीत व्यावसायिकांवर संशोधन केले. त्याचप्रमाणे, संशोधकांनी ‘द स्टडी ऑफ ट्विन ॲडल्ट्स : जीन्स ॲंड एन्हवायर्नमेंट’ (स्टेज) या उपलब्ध संशोधनाच्या माहितीचाही वापर केला. यात सहभागींच्या आनुवाशिंक माहितीचाही समावेश होता. त्यानंतर संशोधकांनी या दोन्ही स्वतंत्र संशोधनाचा तुलनात्मक अभ्यास केला. बालपणासारख्या आयुष्याच्या सुरवातीच्या काळातील सांगितीक क्षमतांचा हौशी तसेच व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या संगीतकाराशी संबंध असल्याचे संशोधकांना आढळले.
आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
संगीतातील आवड व बुद्धिमत्तेचा प्रत्येकाचे वय आणि संगीताचा सराव सुरू करण्याशीही संबंध असल्याचे निदर्शनास आले. संगीतासारख्या विशिष्ट क्षेत्रात अधिक बुद्धिमत्ता दर्शविणाऱ्या मुलांना प्रोत्साहन दिले जायला हवे. संगीताची आवड, पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबात अशा मुलांना पोषक वातावरण प्रदान केले जाऊ शकते. अशी शक्यताही या संशोधनातून अधोरेखित झाली.
बालपणात मेंदू संगीत शिकण्यासाठी अधिक ग्रहणक्षम असतो. आम्ही संगीताचे प्रशिक्षण आणि वयाच्या संबंधांवर प्रकाशझोत टाकला आहे. वैयक्तिकरित्या, संगीताचा सराव सुरू करणाऱ्या प्रत्येकाची अनुवंशिकता व इतर बाबींवरही प्रकाशझोत टाकायला हवा.
लॉरा वेसलडीज, संशोधक, कारोलिंस्का इन्स्टिट्यूट, स्वीडन.
*३१० संगीतकारांवर संशोधन
*अनुवंशिकता, कौटुंबिक वातावरणाचे योगदान अधोरेखित
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.