आयोडीनमुळे कोरोना विषाणू होतात नष्ट; अमेरिकेतील शास्त्रज्ञांचा दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 19 September 2020

आयोडीनमुळे कोरोना विषाणू नष्ट होतात, असा दावा अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केला आहे.

वॉशिंग्टन- आयोडीनमुळे कोरोना विषाणू नष्ट होतात, असा दावा अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केला आहे. नाक व तोंड आयोडीनने स्वच्छ केले तर विषाणूंना तेथेच रोखले जाते व ते फुप्फुसांपर्यंत पोचू शकत नाहीत, असे ‘युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट स्कूल ऑफ मेडिसिन’च्या संशोधन अहवालात म्हटले आहे. ०.५ टक्के प्रमाण असलेल्या आयोडिनच्या द्रावणात हे विषाणू सोडले असता १५ सेकंदात ते नष्ट झाले, असे यात नमूद केले आहे.

कोरोना विषाणू व आयोडीनचा प्रभाव

- मानवाच्या नाकात सर्वाधिक एसीई २ रिसेप्टर असतात.
- कोरोनाचा संसर्ग फैलावण्यास यामुळे मदत मिळते.
- अनेक आजारांत नाक व तोंडातून विषाणूंची शरीरात प्रवेश होतो.
- आयोडीनच्या वापरामुळे कोरोना फुप्फुसात पोचत नाही.
- रुग्णाची प्रकृती खालावत नाही.

मोदी सरकारची चिंता वाढली, एकूण कर्ज पोहोचलं 101.3 लाख कोटी रुपयांवर 

असे झाले संशोधन

- विषाणूंना रोखण्यासाठी नाक व तोंडाच्या स्वच्छतेवर भर.
- संशोधकांनी आयोडीनचे तीन रोगप्रतिबंधक द्रावण तयार केले.
- द्रावणात आयोडीनची मात्रा ०.५ टक्के, १.२५ आणि २.५ टक्के होती.
- या द्रावणांपैकी ०.५ टक्के द्रावणात कोरानाचे विषाणू १५ सेकंदात नष्ट झाले.
- या वेगवेगळ्या द्रावणांमध्ये ७० टक्के इथेनॉल मिसळल्यानंतर १५ आणि ३० सेकंदानंतर कोरोनावर परिणाम दिसून आला.
- प्रयोगात इथेनॉलमुळे कोरोना पूर्णपणे नष्ट होत नसल्याचे आढळले.
- या उलट आयोडीनमुळे १५ सेकंदात कोरोना नष्ट झाला.

संशोधकांचे म्हणणे...

डॉक्टरांनी रुग्णांना आयोडीनने नाक व तोंड धुण्याची पद्धत सांगावी म्हणजे त्याचा वापर करता येईल. असे झाले तर तोंडातील किंवा नाकातील तुषारांमुळे होणारा कोरोनाचा संसर्ग रोखता येईल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Iodine destroys corona viruses Scientists in the US claim