esakal | पाकिस्तानला दणका; इराणने सर्जिकल स्ट्राइक करुन सोडवले सैनिक
sakal

बोलून बातमी शोधा

पाकिस्तानला दणका; इराणने सर्जिकल स्ट्राइक करुन सोडवले सैनिक

सैनिकांचे दहशतवाद्यांकडून २०१८ मध्ये अपहरण झाले होते आणि त्यात १२ सैनिकांचा समावेश होता. पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणाने दिलेल्या माहितीच्या आधारे सर्जिकल स्ट्राईक केल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

पाकिस्तानला दणका; इराणने सर्जिकल स्ट्राइक करुन सोडवले सैनिक

sakal_logo
By
वृत्तसंस्था

तेहरान - इराणच्या रिव्होल्यूनशरी गार्डने पाकिस्तानच्या सीमेवर सर्जिकल स्ट्राईक करत दोन सैनिकांची मुक्तता केली आहे. या सैनिकांचे दहशतवाद्यांकडून २०१८ मध्ये अपहरण झाले होते आणि त्यात १२ सैनिकांचा समावेश होता. पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणाने दिलेल्या माहितीच्या आधारे सर्जिकल स्ट्राईक केल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रिव्होल्यूनशरी गार्डच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना जैश उल अदलकडून इराणच्या सैनिकांना ओलिस ठेवण्यात आले होते. सीमेवर असलेल्या दोन सैनिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मंगळवारी रात्री मोहीम राबवण्यात आली. त्यांचे अडीच वर्षापूर्वी अपहरण करण्यात आले होते. दोन्ही सैनिकांना इराणला पाठवण्यात आले आहे. १६ ऑक्टोबर २०१८ रोजी उल अदल संघटनेने १२ सैनिकांचे अपहरण करून त्यांना बलुचिस्तानमध्ये ठेवले. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिक अधिकाऱ्यांनी बैठक झाली. त्यात १२ पैकी पाच सैनिकांना नोव्हेंबर २०१८ मध्ये सोडण्यात आले. त्यानंतर २१ मार्च २०१९ रोजी पाकिस्तानी सैनिकांकडून चार इराणी सैनिकांची सुटका करण्यात आली. जैश उल अदल किंवा जैश अल अदल जिहादी संघटना असून ती प्रामुख्याने आग्नेय इराणमध्ये सक्रिय आहे. या संघटनेकडून इराणमध्ये सातत्याने हल्ले केले जातात.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image