Global Security : इराणने इस्राईलविरोधी संघर्षात पहिल्यांदा क्लस्टर बाँबचा वापर केला असून, या शस्त्राचा वापर मोठ्या जीवितहानीस कारणीभूत ठरतो. या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायात चिंता व्यक्त केली जात आहे.
तेहरान : इस्राईलविरोधातील संघर्षात इराणने प्रथमच क्लस्टर बाँबचा वापर केला आहे. अल्पावधीत मोठी जीवितहानी घडवून आणण्यासाठी या शस्त्राचा वापर केला जातो. इस्राईलच्या लष्कराने या हल्ल्याला दुजोरा दिल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाची चिंता वाढली आहे.