Iran Missile Strike: इराणने थेट अमेरिकेचा डोळा भेदला! अब्जावधींची क्षेपणास्त्र चेतावणी प्रणाली उद्ध्वस्त, युद्धाला धोकादायक वळण

Iran Strike Reportedly Damages Key US Missile Warning Radar System in Qatar : कतारमधील अमेरिकेच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र पूर्व चेतावणी रडार प्रणालीवर इराणचा हल्ला झाल्याचा दावा; मध्य पूर्वेतील तणाव आणखी तीव्र
Iran Strikes Major US Missile Warning Radar in Qatar, Escalating Middle East Conflict

Iran Strikes Major US Missile Warning Radar in Qatar, Escalating Middle East Conflict

esakal

Updated on

मध्य पूर्वेतील तणावाने भयंकर रूप धारण केले आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर युद्धाची तीव्रता वाढली असताना, इराणने आखाती देशांवर आपले हल्ले सुरू ठेवले आहेत. याच दरम्यान अमेरिकेने हिंदी महासागरात एका इराणी जहाजाला बुडवले, ज्यात ८० हून अधिक जणांचा बळी गेला. मात्र, या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेला मोठा झटका दिल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. इराणी हल्ल्यात कतारमधील अमेरिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेपणास्त्र पूर्व चेतावणी प्रणालीला गंभीर नुकसान झाले आहे. या प्रणालीला त्या प्रदेशातील अमेरिकेचा ‘डोळा’ असे संबोधले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com