Israel Iran Conflict : संघर्षामुळे नागरिक अडकले; इराणमधील स्थिती बिकट; बॉम्बवर्षावामुळे स्थलांतराची नामुष्की
Tehran Under Attack : इस्राईल आणि इराणमध्ये सुरु झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संपूर्ण पश्चिम आशियात भीतीचं वातावरण पसरलं आहे. हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे हजारो परदेशी नागरिक, विद्यार्थी अडकले आहेत.
बैरुत: इस्राईल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे पश्चिम आशियातील स्थिती ढासळत आहे. इस्राईल आणि इराणकडून एकमेकांवर क्षेपणास्त्र डागले जात असल्याने या देशांनी आपली हवाई हद्द पूर्णपणे बंद केली आहे.