
जेरूसलेम : इराण आणि इस्राईलने आज सलग तिसऱ्या दिवशी एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. इस्राईलने इराणच्या संरक्षण विभागाच्या मुख्यालयावर आणि अणु कार्यक्रमाशी संबंधित ठिकाणांवर हल्ले केले तर, इराणच्या क्षेपणास्त्रांनीही इस्राईलची हवाई संरक्षण यंत्रणा भेदत अनेक इमारतींवर मारा केला.