
तेहरान/तेल अवीव: इराण आणि इस्त्रायल यांच्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाचे कारण आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या (IAEA) एका अहवालाला मानले जात होते, ज्यात इराण अणुबॉम्ब बनवत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, आता या अहवालावर IAEA ने स्वतःच पलटी मारली असून, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.