

Strait of Hormuz Reopened
esakal
दुबई: ‘‘आखातात पेटलेल्या संघर्षात आता यापुढे इराण कोणत्याही शेजारील देशावर हल्ला करणार नाही; तसेच आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांबद्दल इराण माफी मागत आहे,’’ असे इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी म्हटले आहे. ‘‘इराण कोणत्याही दबावाला झुकणार नाही आणि इस्राईल किंवा अमेरिकेसमोर तो शरण जाणार नाही,’’ असेही मसूद यांनी म्हटले आहे.