Iran Missile Attack : तेहरानसह अनेक इराणी शहरांमध्ये इस्राईलविरोधात संताप आणि युद्धाची भीती दोन्ही भावना निर्माण झाल्या आहेत. इस्राईलवरील मिसाइल हल्ल्याची दृश्ये सार्वजनिक स्क्रीनवर दाखवली जात असून नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
तेहरान : इस्राईलविरोधात कमालीचा संताप आणि युद्धाच्या संभाव्य हानीची काळजी अशा मिश्र भावनांनी इराणमधील बहुतांश शहरांमध्ये शनिवारची सकाळ उगवली. इस्राईलवर इराणने केलेल्या हल्ल्याची छायाचित्रे पाहून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.