
बीरशिबा : इस्राईलच्या माऱ्याला आणि अमेरिकेच्या दबावाला तोंड देणाऱ्या इराणने आज इस्राईलच्या दक्षिण भागात क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला. या माऱ्यात बीरशिबा या शहरातील एका रुग्णालयाचा बराचसा भाग उद्ध्वस्त झाला. तसेच, तेल अविवजवळील गावांमधील निवासी भागालाही इराणने लक्ष्य केले. या माऱ्यात कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचा दावा इस्राईलने केला असून ४० जण जखमी झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. इस्राईलनेही इराणमधील जड पाण्यावर चालणाऱ्या अणुभट्टीला लक्ष्य केले.