Iran Israel Conflict : इस्राईला परिणाम भोगावे लागतील; इराणचा इशारा; शंभरहून अधिक ड्रोनद्वारे प्रतिहल्ला
Drone Strike : इस्राईलच्या हल्ल्यानंतर इराणने शंभर हून अधिक ड्रोन हल्ले केले असून, या हल्ल्यांचा परिणाम इस्राईलला भोगावा लागेल, असा इशारा दिला आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव वाढत असून संयुक्त राष्ट्रांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
तेहरान : इस्राईलच्या हल्ल्यानंतर इराणने संतप्त प्रतिक्रिया दिली असून या हल्ल्यांचा परिणाम त्यांना निश्चितच भोगावा लागेल, असा इशारा दिला आहे. इस्राईलच्या हल्ल्यानंतर इराणने शंभरहून अधिक ड्रोनद्वारे प्रतिहल्लाही केला.