Iran US Conflict : इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने परखड इशारा दिला आहे की, आमच्यावर हल्ला झाल्यास आम्ही शांत बसणार नाही. आमचे संरक्षण करण्याचा आम्हालाही संपूर्ण अधिकार आहे, असे परराष्ट्रमंत्री अराघची यांनी स्पष्ट केले.
इस्तंबूल : ‘‘अशी कोणतीही लाल रेषा नाही, जी अमेरिकेने ओलांडलेली नाही. आज त्यांनी आमच्या अणुकेंद्रांवर हल्ले करत टोक गाठले आहे. आम्हालाही आमचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे,’’ असा इशारा इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी आज दिला.