Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

Iranian MP Zohreh Elahian: इराणच्या अध्यक्षपदासाठी एक माजी खासदार महिलेने देखील अर्ज दाखल केला आहे. जोहरे इलाहियन असं त्यांचं नाव असून त्या ५७ वर्षांच्या आहेत.
Zohreh Elahian
Zohreh Elahian

तेहरान- इब्राहिम रईसी यांचा काही दिवसांपूर्वी हेलीकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर आता इराणमध्ये अध्यक्षपदासाठी २८ जून रोजी निवडणुका होणार आहेत. त्यासाठी उमेदवाराने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. विशेष म्हणजे इराणच्या अध्यक्षपदासाठी एक माजी खासदार महिलेने देखील अर्ज दाखल केला आहे. जोहरे इलाहियन असं त्यांचं नाव असून त्या ५७ वर्षांच्या आहेत.

जोहरे इलाहियन यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्यांना हे पद मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. इराणच्या कायद्यामध्ये एक संदिग्ध तरतूद आहे. त्यामुळेच त्यांचा अध्यक्षपदाचा अर्ज स्वीकारले जाण्याची शक्यता नाही. इराणच्या कायद्यामध्ये नेमकी काय तरतूद आहे हे आपण जाणून घेऊया.

Zohreh Elahian
Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

जोहरे इलाहियन या दोन वेळा खासदार राहिलेल्या आहेत. पण, त्या अध्यक्ष होण्यात अनेक अडचणी आहेत. अध्यक्षपदाची निवडणूक कोण लढवेल हे इराणची गार्डियन काऊंसिल ठरवत असते. इराणमधील निवडणुका आणि कायदा याच्यावर देखरेख ठेवण्याचं काम गार्डियन काऊंसिल करत असते. यामध्ये १२ सदस्य असतात. या सदस्यांची निवड इराणचे सर्वोच्च नेता करत असतात.

पाच दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिला जातो. त्यानंतर गार्डियन काऊंसिल उमेदवारांच्या अर्जाची छाननी करते. यासाठी सात दिवस घेतले जातात आणि त्यानंतर योग्य उमेदवारांना प्रचारासाठी दोन आठवडे दिले जातात. गार्डियन काऊंसिल ११ जून रोजी उमेदवारांची यादी जाहीर करेल.

Zohreh Elahian
Iran–Israel conflict : ''...तर आम्ही अणुधोरण बदलू'' इराणचा इस्राईलवर अणुहल्ला करण्याचा इशारा

इराणमध्ये अध्यक्ष कोण असेल याबाबतचा निर्णय गार्डियन काऊंसिलच्या हातात असतो. इराणच्या कायद्यानुसार, अध्यक्षपदासाठी उमेदवाराचे वय ४० ते ७५ वर्षादरम्यान असायला हवे. त्याच्याकडे किमान पदवी असावी. कायद्यामध्ये कलम १५ मध्ये एक तरतूद आहे. त्यामुळे जोहरे यांची अडचण झाली आहे.

आर्टिकल १५ मध्ये सांगण्यात आलंय की,उमेदवार हा प्रसिद्ध धार्मिक किंवा राजकीय नेता(रेजल) असायला हवा. रेजलचा अरबीमध्ये अर्थ पुरुष असा होता. पण, इराणमध्ये फारसी भाषा जेंडर न्यूट्रल आहे. मात्र, या तरतुदीमुळेच गोंधळ निर्माण होतो. अध्यक्ष पुरुषच असावा असा अर्थ गार्डियन कऊंसिल घेऊ शकते. त्यामुळे जोहरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली तर अध्यक्षपदासाठी उभे राहिलेल्या त्या पहिल्या महिला ठरतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com