Baghdad Airstrike : ट्रम्प यांनी प्लॅन करत केला इराणच्या कमांडरचा खात्मा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात आणखी अजूनही लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यात डेप्युटी कमांडर महादी अल मुहंदीज यांचांही मृत्यू झाला आहे.

बगदाद : इराणची राजधानी असलेल्या बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमातळावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे टॉप कमांडर कासिम सुलेमानी ठार झाले आहेत. कासिम सुलेमानी यांचा ताफा बगदाद आंतरराष्ट्रीय विमानताळाच्या दिशेने जात होता. त्याचवेळी अमेरिकेकडून हा हवाई हल्ला करण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात आणखी अजूनही लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यात डेप्युटी कमांडर महादी अल मुहंदीज यांचांही मृत्यू झाला आहे.

आज मध्यरात्रीच्या सुमारास आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आला. मृतांमध्ये अनेक महत्वाच्या व्यक्तींचाही समावेश असल्याचे इराण लष्कराकडून जाहीर कऱण्यात आलं. सुलेमानी यांच्यावर इस्त्राईलवर रॉकेट हल्ला केल्याचा आरोप होता. अमेरिका गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या शोधात होती. 

ट्रम्प यांनी दिल्या ऑर्डर
सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर काहीच वेळात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या ध्वजाचा फोटो ट्विट केला होता. त्यामुळे आता त्यांनीच सुलेमानी यांचा मृत्यू घडवून आणल्याचा आरोप केला जात होता. मात्र, त्यानंतर लगेच पेंटागॉन आणि व्हाईट हाऊस यांना ट्रम्प यांनीच या हल्ल्याच्या ऑर्डर दिल्याचे जाहीर केले. ''इराणच्या भविष्यातील हल्ल्यांवर वचक बसविण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता,'' असे पेंटागॉनने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

''अमेरिकेच्या अध्यक्षांनी दिलेल्या सूचनांनुसार अमेरिकेच्या लष्कराने परदेशातील दहशतवादी संघटनांचा प्रमुख सुलेमानीला मारण्याचा निर्णय घेतला,'' असे व्हाईट हाऊसने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Irans Gen Qassem Soleimani killed in US airstrike on Baghdad airport