esakal | इराकमधील भीषण स्फोटामागे ISIS; 30 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

iraq

इराकमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने घेतली आहे. इराकची राजधानी बगदादमध्ये मंगळवारी झालेल्या बॉम्ब स्फोटात आतापर्यंत 30 लोकांचा मृत्यू झाला आहे.

इराकमधील भीषण स्फोटामागे ISIS; 30 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

बगदाद- इराकमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने घेतली आहे. इराकची राजधानी बगदादमध्ये मंगळवारी झालेल्या बॉम्ब स्फोटात आतापर्यंत 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. एका टेलीग्राम ग्रुपवर मेसेज पाठवत आयएसएसने हल्ल्याची जबाबदारी घेतली. अबू हमजा अल नावाच्या दहशतवाद्याने मंगळवारी बगदाद शहरात जाऊन बाजारात स्फोट घडवला, ज्यात 30 जणांचा मृत्यू झालाय आणि अनेकजण जखमी झाले आहेत. (Iraq Market Bombing Claimed By ISIS Kills Nearly 30 On Eve Of Eid Holiday)

एएफपीच्या एका फोटोग्राफरने दिलेल्या माहितीनुसार, 'हा हल्ला गेल्यावर्षातील हल्ल्यांपैकी भीषण स्फोट होता. हल्लेखोराने गर्दीच्या ठिकाणी जाऊन स्वत:ला उडवले. अनेकांच्या शरीराचे भाग विखुरले गेले होते. ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारात मोठी गर्दी होती.' इराकी राष्ट्रपती बरहम सालिह यांनी या हल्ल्याची निंदा केली आहे आणि पीडितांसोबत आपली संवेदना व्यक्त केली आहे. माहितीनुसार मृतांमध्ये आठ महिला आणि सात मुले होते.

हेही वाचा: विठ्ठला कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे; मुख्यमंत्र्यांनी घातले साकडे

स्फोटानंतर सोशल मीडियामध्ये व्हारयल होणाऱ्या व्हीडिओमुळे हल्ल्याची तीव्रता लक्षात येते. व्हीडिओमध्ये अनेक लोक रक्ताने माखलेले दिसत आहेत आणि भीतीने ओरडत आहेत. स्फोट इतका मोठा होता की बाजारातील अनेक दुकानांचे छत फाटले. पत्रकारांच्या आखोदेखीनुसार, सर्वत्र रक्ताचा सडा पडला होतो. जमिनीवर चपला-बुटं विखुरले होते. इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी यांनी बाजार क्षेत्रासाठी जबाबदार पोलीस रेजिमेंट कमांडरला अटक करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणाचा तपास केला जात आहे. इराकमध्ये वर्षभरातील हा तिसरा मोठा स्फोट आहे. इस्लामिक स्टेनने याआधीही अनेकदा बगदादमध्ये स्फोट घडवून आणला आहे, ज्याने अनेकांचा बळा घेतलाय.

loading image