Israel Air Attack: इस्रायलचा गाझामधील हॉस्पिटलवर एअरस्ट्राईक, ५०० जण दगावल्याचा पॅलेस्टाईनचा दावा

Israel Air Attack
Israel Air Attackesakal

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले युद्ध आता चिघळले असून त्याने भीषण रूप धारण केले आहे. या युद्धात आजवर तब्बल 4 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोक जखमी झाले आहेत. अशातच आज पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने दावा केला की इस्रायलने गाझा पट्टीतील अल अहली हॉस्पिटलवर हवाई हल्ला केला असून यात ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

मात्र, इस्रायलकडून अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही. पण जर याची पुष्टी झाली तर 2008 नंतरचा हा इस्रायलचा सर्वात प्राणघातक हल्ला असेल. (Airstrike on hamas)

असोसीएटेड पोस्ट या वृत्तसंस्थेनुसार मंगळवारी मध्य गाझा येथील अल अहली हॉस्पिटलवर हा हवाई हल्ला झाला. गाझा पट्टीतील शेवटचे ख्रिश्चन रुग्णालय असे या हॉस्पिटलचे वर्णन केले जाते. गाझा आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की मंगळवारी इस्रायली सैन्याने अल अहली अरेबिक बॅप्टिस्ट हॉस्पिटलवर हवाई हल्ला केला. या रुग्णालयात मोठ्या संख्येने जखमी आणि इतर पॅलेस्टिनी आश्रय घेत होते. 

अल अहली रुग्णालयावरील हल्ल्याच्या छायाचित्रांमध्ये इमारतीला आग लागल्याचे दिसत आहे. तुटलेल्या काचा इकडे तिकडे विखुरलेले आहेत. रुग्णालयात सर्वत्र मृतदेह विखुरलेले आहेत. 

पॅलेस्टाईनने या हल्ल्याची पुष्टी केली आणि सांगितले की, इस्रायली विमानांनी गाझामधील अल अहली अरब हॉस्पिटलवर बॉम्बफेक केली ज्यात 500 लोक शहीद झाले. यामध्ये महिला आणि लहान मुलेही आहेत. 

मात्र, इस्रायलकडून अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही.इस्रायली लष्कराचे प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हेगेरी म्हणाले की, त्यांना रुग्णालयात मृत्यूची कोणतीही माहिती नाही. माहिती मिळताच हे अपडेट केले जाईल. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com