
दमास्कसः इराणसोबतच्या युद्धानंतर इस्रायलने आता आणखी एका युद्धात उडी घेतली आहे. इस्राईलने शेजारील देश सीरियावर बुधवारी (ता. १६) हवाई हल्ला केला. इस्राईलने राजधानी दमास्कसमधील सीरियाच्या लष्कराच्या मुख्यालयावर आणि सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर हल्ला केला आहे.