
देर अल बलाह (गाझा पट्टी) : ‘‘इस्राईल गाझामधील युद्ध संपविण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेल्या योजनेच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी करण्याची तयारी करीत आहे,’’ अशी प्रतिक्रिया इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिल्यानंतरही इस्राईलने गाझा पट्टीवरील हल्ले सुरूच ठेवले आहेत.