Arab Israelis: नेतन्याहू यांच्या खूर्चीला हदरा देणारे २० लाख अरब आले कुठून? इस्रायलमध्ये सत्तापालट होण्याच्या मार्गावर

Arab citizens of Israel explainer: या अरबांचा इस्त्रायलमधील इतिहास समजून घेण्यासाठी इस्त्रायलच्या निर्मितीचा इतिहास पहावा लागतो. या भूमीवर मूळ यहुदी संस्कृतीनंतर रोमन साम्राज्याने कब्जा करून यहुद्यांवर अत्याचार केले व त्यांना हाकलून लावले.
Benjamin Netanyahu

Benjamin Netanyahu

esakal

Updated on: 

2 million Arab Israelis: इस्त्रायलच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सत्तेवर मोठे संकट निर्माण झाले असून देशातील सुमारे २० लाख अरब नागरिकांची राजकीय ताकद जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली आहे. १२० जागांच्या इस्त्रायली संसदेत सरकार स्थापनेसाठी ६१ जागांच्या बहुमताची आवश्यकता असताना, नेतान्याहू यांच्या यहुदी पक्षांच्या युतीला ५३, तर माजी लष्करप्रमुख गादी आयझेनकोट यांच्या नेतृत्वाखालील विरोधी यहुदी आघाडीला ४८ जागा मिळाल्या आहेत.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Link:

https://www.esakal.com/get-app?utm_source=esakal_web&utm_medium=inline_callout&utm_campaign=app_download&utm_content=article_mid

Loading content, please wait...