Israel Gaza Conflict
sakal
ग्लोबल
Israel Gaza Conflict: गाझा पट्टीत इस्राईलचे हल्ले; १०४ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये महिला, लहान मुलांचा समावेश
Air strikes: इस्राईलच्या हवाई हल्ल्यांमुळे गाझा पट्टीत १०४ नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात महिला व ४६ मुलांचा समावेश आहे. शस्त्रसंधी असूनही संघर्ष वाढत असून मानवी संकट तीव्र बनले आहे.
देर अल बाला (गाझा पट्टी) : इस्राईलने गाझा पट्टीत मंगळवारी रात्रभर केलेल्या हल्ल्यामध्ये १०४ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये महिला आणि ४६ लहान मुलांचा समावेश आहे. गाझा शहरातील दवाखान्यात दाखल झालेल्या ५० जखमी नागरिकांपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जखमींमध्ये २० जणांचा मृत्यू आहे.

