
Israel Hamas
sakal
कैरो : दोन वर्षांपासून पश्चिम आशियात सुरू असलेला भीषण संघर्ष आता थांबला असून हमास आणि इस्राईल यांच्यातील शस्त्रसंधीतील प्राथमिक करारानुसार आज ओलिस आणि पॅलेस्टिनी नागरिकांच्या देवाणघेवाणीची प्रक्रिया झाली. हमासने २० इस्रायली ओलिसांची सुटका केली, तर इस्राईलने प्रत्युत्तरादाखल तुरुंगातील सुमारे दोन हजार पॅलेस्टिनी कैद्यांना सोडण्याची तयारी केली.