Israel Hamas War : इस्रायल हमासच्या बोगद्यांचं जाळं उद्ध्वस्त करू शकेल का? जाणून घ्या हमासच हे चक्रव्यूह किती मजबूत आहे

इस्रायल आणि हमास यांच्यात 7 ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे
Israel Hamas War
Israel Hamas Waresakal

Israel Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यात 7 ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. हमासचा बालेकिल्ला असलेल्या गाझामध्ये असलेले बोगदे इस्रायली लष्करासाठी डोकेदुखी ठरले आहेत. हमास या बोगद्यातूनच युद्ध करत आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अमेरिकन गुप्तचर अहवालानुसार, इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्याची योजना या बोगद्याच्या तळांतून तयार करण्यात आली होती. हमासचा हा चक्रव्यूह किती मजबूत आहे आणि इस्त्रायली लष्कराने त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी कोणती योजना आखली आहे ते जाणून घेऊया.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हमासने एकमेकांशी संवाद साधण्यासाठी या बोगद्यांमध्ये फोन लाइन टाकल्या आहेत, जे इस्रायली सैन्य ट्रॅक करू शकत नाही. या बोगद्यांमध्ये हमासचे लढवय्ये एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मोबाईल फोन वापरत नाहीत, त्यामुळेच त्यांचा माग काढणे कठीण आहे. हमासने बांधलेल्या या बोगद्यांना 'गाझा मेट्रो' म्हणतात. या बोगद्यांमध्ये हमास रॉकेट आणि दारूगोळाही साठवून ठेवतो, असेही सांगितले जाते. याशिवाय तो बोगद्यातून शस्त्रास्त्रांची तस्करीही करतो.

Israel Hamas War
Child Mental Health : सोशल मीडियावर तुमची मुलं किती वेळ घालवताय? 76% टक्के मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम

बोगदे किती लांब आहेत?

असे मानले जाते की गाझामध्ये अस्तित्वात असलेल्या बोगद्यांचा चक्रव्यूह 41 किमी लांब आणि 10 किमी रुंद आहे. 2021 मध्ये, हमासने गाझा अंतर्गत 500 किमी लांबीचे बोगदे बांधण्याचा दावा केला होता. मात्र, गाझामध्ये नेमके किती बोगदे आहेत, याचा अद्याप कोणताही आकडा समोर आलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही बोगदे जमिनीपासून 30 किंवा 40 मीटर खोल आहेत. या बोगद्यांमध्ये हमासने ओलिस ठेवलेले लोकही राहतात.

Israel Hamas War
Health Care News: मासिक पाळीतील मूड स्विंग्सनी हैराण? मग तुम्हाला मदत करतील या टिप्स…

इस्रायलने बोगदा शोधून काढला

2013 मध्ये, इस्रायल संरक्षण दलांनी 1.6 किमी लांब, 18 मीटर खोल बोगदा काँक्रीटचे छप्पर आणि भिंती शोधून काढल्या. हा बोगदा इस्रायली किबुट्झजवळ गाझा पट्टीतून निघत होता. 2020 मध्ये, इस्रायलने गाझा पट्टीतून सीमेपलीकडे एक नवीन बोगदा शोधला. त्यावेळी इस्रायली लष्कराने सांगितले होते की हा बोगदा डझनभर मीटर भूमिगत असून दक्षिण इस्रायलपर्यंत विस्तारित आहे.

Israel Hamas War
Health Care News: तिखटाशिवाय पदार्थांची चव लागत नाही? सतत तिखट खायला आवडते, तर जाणून घ्या त्याचे दूष्परिणाम

इस्रायल बोगद्यांचे चक्रव्यूह नष्ट करेल

इस्रायली लष्कराने बोगद्यांचे चक्रव्यूह नष्ट करण्याची योजना तयार केली आहे. इस्रायली लष्कराने स्पंज बॉम्बद्वारे बोगदे नष्ट करण्याची योजना आखली आहे. स्पंज बॉम्ब हा द्रव स्वरूपात असतो आणि तो प्लास्टिकच्या डब्यात बंद असतो. तो अचानक स्फोट होऊन बोगद्याचे मार्ग अडवतो. हे बोगदे नष्ट करण्यासाठी इस्रायल रासायनिक ग्रेनेड्सचीही चाचणी करत आहे. तो यशस्वी झाल्यास इस्रायल त्याचा वापर गाझामधील बोगद्यांवर करेल. यामुळे बोगद्यांचे प्रवेश मार्ग पूर्णपणे बंद होतील आणि हमासचे सैनिक बोगद्यातून बाहेर पडू शकणार नाहीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com