Israel Hamas War : गाझा पट्टीतील युद्ध लांबणार; इस्राइलचा अनेक ठिकाणी मारा सुरूच!

इस्राईलच्या सैनिकांनी गाझा पट्टीत रणगाडे घुसवत काही ठिकाणी छापेही टाकले.
Israel Hamas War
Israel Hamas WareSakal

इस्राईलच्या विमानांनी सोमवारी पहाटेच गाझा शहर आणि परिसरात जोरदार हवाई हल्ले केले. हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी पॅलेस्टिनी नागरिकांना ज्या ठिकाणांवर आश्रय घेण्यास सांगितले होते, त्या ठिकाणांवरही हवाई हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये काही जणांचा मृत्यू झाला असला तरी निश्‍चित संख्या स्पष्ट झालेली नाही. हमासविरोधातील अशी कारवाई काही महिनेही चालू शकते, असा इशाराही इस्राईलने दिला आहे.

इस्राईल-हमास यांच्यातील युद्धाचा सोमवारी १७वा दिवस होता. इस्राईलने गाझा पट्टीच्या सीमेनजीक प्रचंड सैन्य तैनात केले असले तरी अद्यापही आक्रमण सुरू केलेले नाही. गाझा शहरासह परिसरात अद्यापही हजारो सामान्य पॅलेस्टिनी नागरिक राहात असल्याने मोठी कारवाई करण्यात इस्रायली सैन्याला अडचण येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

म्हणूनच, उत्तर गाझा पट्टीत असलेल्या उर्वरित नागरिकांना दक्षिण गाझा पट्टीत जाण्यास भाग पाडण्यासाठी सोमवारी हल्ले केल्याचे मानले जात आहे. हमासविरोधातील ही कारवाई दीर्घकाळ चालण्याचा इशारा इस्राईलने दिला आहे.

Israel Hamas War
Putin Cardiac Arrest : पुतीन यांना हार्ट अटॅक, रुममध्येच खाली कोसळले; डॉक्टरांनी वाचवले प्राण - रिपोर्ट

इस्राईलच्या सैनिकांनी गाझा पट्टीत रणगाडे घुसवत काही ठिकाणी छापेही टाकले. अपह्रतांचा शोध घेण्यासाठी हे छापे टाकल्याचा दावा इस्राईलने केला. या छाप्यांदरम्यान हमासबरोबर त्यांची चकमक झाली. हमासने केलेल्या रॉकेट हल्ल्यात इस्राईलचा एक रणगाडा निकामी झाला, तर एक सैनिक मारला गेला.

‘आणखी ट्रक आत सोडावेत’

गाझा पट्टीतील नागरिकांसाठी इजिप्तच्या सीमेवरील राफा येथून मदतसाहित्याचा पुरवठा सुरू झाला आहे. मागील दोन दिवसांत मिळून मदत साहित्याचे ३५ ट्रक गाझामध्ये दाखल झाले आहेत. औषध, अन्न आणि पाणी यांचा पुरवठा प्रामुख्याने करण्यात आला. इस्राईलने अद्यापही इंधनासाठी परवानगी दिलेली नाही. संयुक्त राष्ट्र आणि इतर देशांकडून आलेल्या मदतीच्या तुलनेत केवळ चारच टक्के मदत गाझामध्ये पाठविली जात आहे. त्यामुळे दररोज १५ ते २० ट्रकना परवानगी देण्याऐवजी किमान १०० ट्रक गाझामध्ये दाखल होणे आवश्‍यक आहे, तरच गरजूंना पुरेशी मदत मिळेल, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.

Israel Hamas War
Israel-Hamas War : ''अमानवी कृत्य थांबवा...'' इस्रायलला बराक ओबामांचा इशारा

युद्धातील हानी

इस्राईल

  • मृत्यू : १,४००

  • अपहरण : २२२

पॅलेस्टाईन

  • मृत्यू : ४,७४७

  • जखमी : १४,२५४

"उत्तर सीमेवरून हिज्बुल्लाने आमच्यावर हल्ले केले तर त्यांना कायमची अद्दल घडवू. ते कल्पनाही करू शकणार नाहीत, इतक्या प्रमाणात आम्ही त्यांना जर्जर करून टाकू. हिज्बुल्लाला मदत केल्याचा परिणाम लेबनॉनलाही भोगावा लागेल." असं मत इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी व्यक्त केलं.

सीरिया, लेबनॉनमध्येही हल्ले

इस्राईलच्या लढाऊ विमानांनी आज गाझा पट्टीसह पश्‍चिम किनारपट्टी भागातही निवडक ठिकाणी मारा केला. याशिवाय, दहशतवाद्यांना लक्ष्य करत सीरिया आणि लेबनॉनमधील काही भागांतही बाँबफेक केली. लेबनॉनच्या सीमेवर हिज्बुल्लाच्या दहशतवाद्यांबरोबरही सैनिकांची चकमक झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com