
नवी दिल्ली: इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची विमानवाहू नौका 'यूएसएस निमित्झ' दक्षिण चीन समुद्रातून पश्चिमेकडे, म्हणजेच मध्य पूर्वेकडे रवाना झाली आहे. व्हिएतनाममधील दानांग येथे नियोजित असलेला तिचा बंदर दौरा रद्द करण्यात आला आहे. 'आकस्मिक ऑपरेशनल गरज' असल्याचे कारण अमेरिकेने दिले असले तरी, यामागे इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकेची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.