Israel Hamas War: मध्य गाझा पट्टीसाठी स्थलांतर सूचना; शस्त्रसंधीबाबत चर्चा सुरू असताना इस्राईलच्या सैन्याचा निर्णय
Gaza Crisis: मध्य गाझामधून इस्राईलने नवीन स्थलांतर आदेश जारी केल्याने मानवी संकट अधिक गडद होत चालले आहे. या कारवाईने गाझा पट्टीतील शहरांमधील संपर्क तुटत असून, चर्चांदरम्यान इस्राईलचा दबाव वाढतोय.
देर-अल-बलाह (गाझा पट्टी) : इस्राईलच्या सैन्याने रविवारी मध्य गाझामधील काही भागांसाठी नवीन स्थलांतर सूचना जारी केल्या. मध्य गाझातील या भागात सैन्याने क्वचितच लष्करी कारवाई केली आहे.