
जेरूसलेम/तेहरान : इराणवरील हवाई क्षेत्रावर वर्चस्व मिळविल्यानंतर इस्राईलने आज या देशाची राजधानी तेहरानवर २५ लढाऊ विमानांतून क्षेपणास्त्रांचा मारा केला. एकूण चाळीस ठिकाणांना लक्ष्य केलेल्या या हल्ल्यात काही जणांचा मृत्यू झाला. इराणने या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला.